
छत्रपती संभाजीनगर : ‘शिवसेना शिंदे गटात निवडून आलेले अनेक आमदार हे भाजपने दिलेले उमेदवार आहेत. त्यामुळे नाराज झाले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काहीच करू शकत नाही. भाजप त्यांना कुठेही हलू देणार नाही’, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केले.