फोटोसह (लोगो)
ABD26J82072
परभणी ः वसमत रोडवरील सुधाकर रामभाऊ आंबिलवादे सराफ ॲण्ड ज्वेलर्स या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित बाळू गुरू असोलेकर, लता सुधाकर आंबिलवादे, समीर आंबिलवादे, नीलांबरी आंबिलवादे, हिमनी, अभिजित यांच्यासह कुटुंबीय, ग्राहक.
-------------------------
वसमत रोडवर आंबिलवादे
ज्वेलर्सचे परभणीत उद्घाटन
बाळू गुरू असोलेकर यांच्या उपस्थितीत सोहळा
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २५ : शहरातील वसमत रोड येथे सुधाकर रामभाऊ आंबिलवादे यांच्या आंबिलवादे सराफ ॲण्ड ज्वेलर्स या दालनाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात झाले. या उद्घाटन सोहळ्यास बाळू गुरू असोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन सराफ दालनाच्या उद्घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण होते. या प्रसंगी लता सुधाकर आंबिलवादे, समीर आंबिलवादे, नीलांबरी आंबिलवादे, हिमनी, अभिजित यांच्यासह कुटुंबीय, ग्राहक, मित्रमंडळी, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसमत रोड परिसरात सुरू झालेल्या या नवीन दालनामुळे ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी आंबिलवादे कुटुंबीयांना शुभेच्छा देत त्यांच्या नवीन व्यावसायिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कुटुंबीय, मित्रमंडळी, ग्राहकांच्या पस्थितीत उद्घाटन सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.