
क्रांती चौक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे क्रांती चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याशिवाय विविध पक्ष, संघटनांतर्फेही विविध ठिकाणी आंदोलने करीत संताप व्यक्त करण्यात आला.