परभणीत शनिवार, रविवारी

परभणीत शनिवार, रविवारी
Published on: 
स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ शहरात शनिवार, रविवार ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ प्रदर्शन ----- परभणी, ता. २० : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उत्पादक, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ व २५ ऑक्टोबरला नांदखेडा रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालयात सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती उत्पादने, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदींचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. स्थानिक उत्पादक व विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी संधी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने खरेदी करता यावीत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण झाल्याने लघुउद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ‘अमृत’ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी संस्था कार्यरत आहे. या घटकांतील पात्र व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळतो. ----- स्थानिक उद्योजक, उत्पादक आणि विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी नागरिकांनी कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी. -अनिरुद्ध काटे, जिल्हा व्यवस्थापक, अमृत संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com