

Phulambri Congress protest
esakal
फुलंब्री : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीवरून फुलंब्री तालुक्यात तीव्र असंतोष उफाळून आला. तिकीट वाटपात डावलल्याने नाराज झालेल्या काँग्रेस समर्थकांनी फुलंब्री येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन जोरदार गदारोळ घातल्याची घटना घडली. यावेळी केवळ उमेदवारी नाकारल्याचा संतापच नव्हे, तर पैसे देऊन तिकीट विकल्याचा गंभीर आरोपही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.