
छत्रपती संभाजीनगर : सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलने ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत बाजार समिती पुन्हा ताब्यात घेतली. महाविकास आघाडीला केवळ चार जागा मिळविता आल्या. यामुळे राधाकिसन पठाडेंचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
तीन ते चार वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कधी विकासाच्या कामाने तर कधी भ्रष्टाचाराच्या कामाने चर्चेत आहे. यामुळे बाजार समितीकडे अनेकांच्या नजरा होत्या. काँग्रेसच्या ताब्यातून बाजार समिती भाजपकडे आणणारे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी पुन्हा बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार बागडेंच्या माध्यमातून पूर्ण तयारी केली होती.
त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले जगन्नाथ काळे यांनीही डॉ. कल्याण काळे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची मोट बांधली होती. त्यातून प्रचार केला. मात्र मतदारांनी पठाडेंच्या बाजूनी कौल दिला. या निवडणुकीत ९५.२९ टक्के म्हणजे ३,२१७ जणांनी मतदान केले. सर्वच मतदारसंघातून ५६२ मते अवैध ठरली.
यात सहकार संस्था मागासवर्गीय मतदारसंघातून सर्वाधिक १०२ मते अवैध ठरली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रयत्न कमी पडल्यामुळे पराभव झाला. अनेक मतदारसंघात थोड्या मतावरून महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे उमेदवारांतर्फे सांगण्यात आले. निकालासाठी कार्यकर्ते पदाधिकारी सकाळीच थाट मांडून होते.
निकाल लागल्यानंतर गुलालाची उधळण करीत सर्वांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आम्रपाली काशीकर, यशवंत देवकर, डी. एच. चव्हाण, श्रीराम सोन्ने, प्रशांत सदाफुले, नवीन कुमार सातपुते, सुषमा साबळे, नीलेश देशमुख यांनी मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
हा धनशक्तीचा विजय ः जगन्नाथ काळे
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य अशी झाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला आहे. आम्ही सर्व तरुण चेहरे दिले होते. त्यांनी चांगली लढत दिल्यामुळे मंत्री, आमदारांना या निवडणुकीच्या प्रचारात उतरावे लागले. अनेक उमेदवारांचा थोड्या मताने पराभव झाला, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे जगन्नाथ काळे यांनी दिली.
राधाकिसन देवराव पठाडे (सहकार संस्था सर्वसाधारण) ४६१
श्रीराम भाऊसाहेब शेळके (सहकार संस्था सर्वसाधारण) ४५४
गणेश सांडू दहीहंडे (सहकार संस्था सर्वसाधारण) ३९८
भागचंद रुस्तुम ठोंबरे (सहकार संस्था सर्वसाधारण) ३७२
अभिजित भास्कर देशमुख (सहकार संस्था सर्वसाधारण) ५१८
मुरलीधर पुंडलिक चौधरी (सहकार संस्था सर्वसाधारण) ३८२
दत्ताभाऊ पांडुरंग उकर्डे (ग्रामपंचायत सर्वसाधारण) ५२७
भागिनाथ रणुबा नवपुते (सहकारी संस्था इ.मा.व मतदारसंघ) ४१२
पूनमचंद सोनाजी बमणे (सहकारी संस्था, वि.जा. भ.ज.) ४६५
सुजाता मनोज गायके (महिला राखीव, मतदारसंघ) ५२३
जनाबाई ज्ञानेश्वर ठोंबरे (महिला राखीव, मतदारसंघ) ४६५
महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे ४ उमेदवार विजयी
जगन्नाथ वैजनाथ काळे (सहकारी संस्था सर्वसाधारण गट) ४२५
कैलास ज्ञानदेव उकर्डे (ग्रामपंचायत सर्वसाधारण) ५८६
महेंद्र जनार्दन खोतकर (ग्रामपंचायत अ.जा/अ.ज.मतदारसंघ) ५४५
पठाण अब्दुल रहिम अब्दुल सलाम (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल) ५३३
व्यापारी मतदारसंघ
नीलेश इंदरचंद सेठी ४२८
कन्हैयालाल बिहारीलाल जैस्वाल ४८४
हमाल मापाडी-तोलारी मतदारसंघ
देविदास कीर्तिशाही २११
बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला. आता बाजार समितीत उर्वरित विकास करणार आहे. यासह धनशक्ती वापराचा आरोप करणाऱ्यांनी शपथ घेऊन सांगावे, की त्यांनी एक दमडीही खर्च केली नाही म्हणून.
-आमदार हरिभाऊ बागडे
पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार हरिभाऊ बागडेंच्या माध्यमातून निवडणूक लढवली. यात आमचा मोठा विजय झाला. ११ जागा आम्ही निवडून आणल्या. बाजार समितीचा थांबलेला विकास करणार आहे.
-राधाकिसन पठाडे, विजयी उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.