
बीड : अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गाच्या कामाला वेग आलेला असतानाच आता धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित लोहमार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी सहा कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतिश कुमार यांच्या समवेत खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रस्तावित लोहमार्गाची ॲानलाईन पाहणी केली.