खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक विभागात सुभेदारपदी कार्यरत असलेल्या मनोजकुमार काटकर यांच्या कारने पादचाऱ्यांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. .ही घटना खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नंद्राबाद गावाजवळ रविवारी (ता. तीन) सकाळी सातला घडली. सुभेदार मनोजकुमार मारोती काटकर हे पत्नीसह कारमधून (क्र. बीएच २४, ५३६३ डी) खुलताबादला फिरायला आले होते..नंद्राबाद गावाजवळील तलत अध्यापक महाविद्यालयासमोर मनोजकुमार यांच्या वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या दोघांना धडक दिली. यात अशोक यादव घुसळे (वय ५५, रा. नंद्राबाद) आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव (रा. ममनापूर, ह.मु. नंद्राबाद) यांचा मृत्यू झाला..Rashi Bhavishya 28th June 2025 Horoscope News in Marathi - आजचे राशिभविष्य - 28 जून 2025.यानंतर मनोजकुमार यांनी कार आणखी भरधाव चालवत म्हैसमाळ रोडकडे नेली. त्यानंतर या ठिकाणी मारहाण होईल, या भीतीने ते सरळ खुलताबाद पोलिस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी खुलताबाद पोलिसांत मनोजकुमार काटकर यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.