IllegalAsh Transport : परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचा काळाबाजार वाढत आहे. अनेक गावांनी या संदर्भात आंदोलने केली असली तरी प्रशासनाने आश्वासनांच्या पलीकडे काहीच केले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचा काळाबाजार सुरू आहे. अवैध राख वाहतुकीविरोधात अनेक गावांनी आक्रमक आंदोलने केली. पण, प्रशासनाने आश्वासनांशिवाय काहीच न केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.