औरंगाबाद : दोन हजार क्विंटल बटाटे, बाराशे क्विंटल रताळ्यांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Potatoes and Sweet potatoes

औरंगाबाद : दोन हजार क्विंटल बटाटे, बाराशे क्विंटल रताळ्यांची आवक

औरंगाबाद - आषाढी एकादशी निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून बटाटे आणि रताळ्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी आणि शनिवारी २ हजार २४० क्विंटल बटाटे आणि १ हजार २५७ क्विंटल रताळ्याची आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक घटली असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे.

आषाढीसाठी आठवडाभरापूर्वीच बटाटे आणि रताळ्यांची आवक सुरू होते. यंदा मात्र मागणी कमी असल्यामुळे आवक कमी झाली. यंदा बाजार बाजार समितीत गुरुवारी ११२० क्विंटल, शनिवारी ११२० असे क्विंटल आवक झाली आहे. तर गुरुवारी रताळे २९७ क्विंटल तर शनिवारी ९६० क्विंटल आवक झाली. बटाट्याला दीड हजार ते दोन हजार रुपयांचा दर मिळाला. दर २५ ते ३० रुपये किलोने किरकोळ स्वरूपात विक्री झाले. तर रताळ्यास अठ्ठावीसशे ते चार हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला. सरासरी साडेतीन हजार रुपये दर मिळाल्यामुळे किरकोळ बाजारात रताळे ४० ते ५० रुपये किलोने विक्री होणार असल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.

Web Title: Ashadi Ekadashi 2022 Aurangabad Two Thousand Quintals Potatoes 1200 Quintals Sweet Potatoes Market Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top