
छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध बाफना ज्वेलर्समध्ये ‘कुंपणानेच शेत खाल्ल्या’चा प्रकार घडला. येथील असिस्टंट सेल्स मॅनेजरनेच दोन कोटींचे सोने लांबविल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. याप्रकरणी संदीप कुलथे (रा. भानुदासनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.