औरंगाबादेत सहायक पोलिस निरीक्षकाला एनएसजी कमांडोची मारहाण

नगर नाक्यावर एपीआय पांडूरंग भागीले यांच्यासह आठ ते नऊ कर्मचारी नाकाबंदी करत होते
Aurangabad
AurangabadAurangabad

औरंगाबाद: नाकाबंदीदरम्यान शहरातील छावणी भागातल्या नगरनाक्यावर विनामास्क जाणाऱ्या एनएसजी (केंद्रीय सुरक्षा बल) कमांडोचे वाहन थांबवून दंडाची पावती घेण्याबाबत सूचना करताच कमांडोने दोन जमादारांना मारहाण केली. हा प्रकार पाहताच मध्यस्थीसाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना कमांडोने फायटरने मारहाण करुन डोके फोडले. ही घटना बुधवारी (ता.३०) दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली. या मारहाणीत सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागीले, जमादार श्रीधर टाक आणि किशोर घोडेले हे जखमी झाले आहेत. तिन्ही जखमी पोलिसांवर सध्या घाटीत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर नाक्यावर एपीआय पांडूरंग भागीले यांच्यासह आठ ते नऊ कर्मचारी नाकाबंदी करत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंढरपूरहून हर्सूलच्या दिशेने बोलेरोमध्ये (एमएच २० एवाय ००११) जात असलेल्या एनएसजी कमांडो गणेश गोपीनाथ भुमे (३४, मुळ रा. फुलंब्री) याला छावणी पोलीस ठाण्यातील जमादार किशोर घोडेले यांनी थांबविले. यावेळी भुमे हा विनामास्क आणि दारुच्या नशेत तर्रर असल्याने पोलिसांनी त्याला दंडाची पावती घेण्याबाबत सूचना केली. त्यामुळे भुमे याने आपण केंद्रीय संरक्षणमंत्री यांचा बॉडीगार्ड असल्याची बतावणी करत आपल्याला ओळखपत्र का मागता असे म्हणत जमादार घोडेले यांच्या तोंडावर बुक्की मारुन हाताला चावा घेतला.

Aurangabad
धक्कादायक! औरंगाबाद शहरात पावणेदोन लाख कोरोना चाचण्यांचा घोळ

हा प्रकार पाहताच त्याचठिकाणी असलेले जमादार टाक यांनी धाव घेतली. पोलिसांनी भुमे याला कारमधून खाली उतरविले. त्यानंतर भुमे याने पोलिसांना धक्काबुक्कीला सुरूवात केली. यादरम्यान जमादार टाक यांचे कपडे फाटले. तर सहायक पोलीस निरीक्षक भागीले यांना भुमेने फायटरने मारहाण केली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी भुमे व त्याच्या भावाला ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज पगारे आणखी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर भुमे व त्याच्या भावाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उपायुक्त निकेश खाटमोडे आणि सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ पोलीस ठाण्यात दाखल झाले. अर्धा तास भुमेची चौकशी केल्यानंतर त्याची घाटीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, वृत्त देईपर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सुट्टीवर आला होता भुमे-
भुमे हा हरियाणातील मनेसरमध्ये असलेल्या एनएसजीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे. तो एक महिन्याच्या सुट्टीवर आला असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. पंढरपूर येथे घरी गेल्यानंतर तेथून तो कारने भावासोबत फुलंब्रीकडे जात होता. त्याच्या भावाने वाद मिटविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतू दारुच्या नशेत तर्रर असलेला भुमे काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com