Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

Ambajogai Ganja Seizure Case : अंबाजोगाई पोलिसांनी मूर्ती फाट्याजवळ सापळा रचून १० लाख ८०० रुपये किमतीचा ३३ किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ambajogai Ganja Seizure Case

Ambajogai Ganja Seizure Case

esakal

Updated on

घाटनांदूर : दोन व्यक्ती गांजा घेऊन धर्मापुरी येथील एका व्यक्तीस देण्यासाठी दहा किलो गांजा येत असल्याची खबर अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना मिळताच (ता.४) बुधवारी सापळा रचून मूर्ती फाड्या लगत पट्टीवडगाव दोन व्यक्तींना तेहतीस किलो आठशे ग्रॅम गांजासह ज्याचे मुल्य १० लाख आठशे रुपये किमतीचा गांजा जप्त करून आरोपीस अटक केली. रात्री उशिरा बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com