
वैजापूर : बँक लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने गेट कापले. यावेळी गॅस कटरचा स्फोट होऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा पूर्णपणे खाक झाली. ही घटना रविवारी (ता. २०) पहाटे तीन वाजेच्या सुमारास वैजापूर शहरात घडली. आगीत १५ लाखांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी घटनास्थळी सोडलेली कार पोलिसांनी हस्तगत केली. कारमध्ये पेट्रोल, टॉमी, कोयते, कटर मिळून आले आहे.