esakal | Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

बोलून बातमी शोधा

covid 19 updates
Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात रविवारी (ता.२५) दिवसभरात ६ हजार ९९९ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी: लातूर १५२२, बीड १२३७, नांदेड ११०५, औरंगाबाद १०८१, जालना ७५६, परभणी ६३९, उस्मानाबाद ५६९, हिंगोली ९०.

उपचारादरम्यान १४४ जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबाद- नांदेडमध्ये प्रत्येकी २७, लातूर २५, बीड २०, उस्मानाबाद १६, हिंगोली- परभणीत प्रत्येकी १०, जालन्यातील नऊ जणांचा समावेश आहे.

वाधका, औरंगाबाद येथील पुरुष (वय ७५), छारनेर, ता. सिल्लोड येथील महिला (६०), कबाडीपुरा, औरंगाबाद येथील महिला (४३), खिरडी (ता. खुलताबाद) येथील पुरुष (४५), आडगाव, औरंगाबाद येथील पुरुष (५०), देवळाईतील महिला (५६), उपळा (ता. कन्नड) येथील महिला (४५), जामगाव (ता. गंगापूर) येथील (७०) व्यक्ती, समता नगरातील पुरुष (६८), रोटेगाव (ता. वैजापूर) येथील पुरुष (५६), वडगाव कोलाटी भागातील महिला (७०), मंजारी (ता. गंगापूर) येथील महिला (५५), पदमपुऱ्यातील महिला (६७), बाळापूर (ता. सिल्लोड)

येथील पुरुष (४५), वडगाव कोल्हाटीतील पुरुष (५२), रांजणगावातील महिला (६२), वडोद बाजार येथील महिला (६०), कन्नडमधील पुरुष (५४), नांदेडा (ता. गंगापूर) येथील पुरुष (३६), सोबलगाव (ता. खुलताबाद) येथील पुरुष (४५), कन्नड येथील महिला (७०), मंजूरपुरा भागातील महिलेचा (५५) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. जवखेडा (ता. कन्नड) येथील पुरुष (५२), सानपखेडा (ता. पैठण) येथील महिलेचा (७०) जिल्हा सामान्य रुग्णालयात तर शिवना (ता. सिल्लोड) येथील पुरुष (८०), एन -१ सिडको भागातील पुरुष (६६), कोटला कॉलनीतील पुरुषाचा (३०) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

वाढले अकराशे, बरे सतराशे रुग्ण-

औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ८१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ५६९ झाली. सध्या १३ हजार ६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १ हजार ६९३ जणांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९५१, ग्रामीण भागातील ७४२ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख २ हजार ५८१ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोना मीटर (औरंगाबाद)-

आतापर्यंतचे बाधित ११८५६९

बरे झालेले रुग्ण १०२५८१

उपचार घेणारे रुग्ण १३६१५

आतापर्यंत मृत्यू २३७३