संभाजीनगरात असेंबल झालेली ऑडी क्यू-३ बाजारात

संभाजीनगरात असेंबल झालेली ऑडी क्यू-३ बाजारात
Published on: 
ABD26J81637 ((((फोटो ओळ))) छत्रपती संभाजीनगर ः शेंद्रा येथे असेंबल झालेली ऑडीची क्यू ३ एसयूव्ही. --- संभाजीनगरात असेंबल झालेली ऑडी क्यू-३ बाजारात --- शहराच्या ऑटोमोबाइल क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी ‘ऑडी’ने आपली बहुप्रतीक्षित कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही ऑडीची नवी क्यू-३ भारतीय बाजारात अधिकृतपणे शुक्रवारी (ता. १६) मुंबईत लाँच केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारची स्थानिक असेंब्ली छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा येथील स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) अत्याधुनिक प्रकल्पात झाली आहे. या लाँचिंगप्रसंगी बोलताना एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष अरोरा म्हणाले, ‘‘ऑडीच्या नवीन क्यू-३ चे उत्पादन संभाजीनगर प्रकल्पात होणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. भारत केवळ आमची मोठी बाजारपेठ नसून एक प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग हब बनले आहे.’’ ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लन यांनीही स्थानिक उत्पादनामुळे भारतीय ग्राहकांच्या गरजा अचूक पूर्ण करता येतील, असा विश्वास व्यक्त केला. नव्या क्यू-३मध्ये दोन लिटरचे टीएफएसआय पेट्रोल इंजिन असून, ते १५० किलोवॉट शक्ती आणि ३२० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ही कार ७.१ सेकंदांत ताशी शून्य ते १०० किलोमीटर वेग गाठते. क्वात्रो ऑल-व्हील ड्राइव्ह प्रणालीमुळे विविध रस्त्यांवर वाहनावरील नियंत्रणास मदत होते. कारमध्ये डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, टचस्क्रीन आणि हेड-अप डिस्प्ले आहे. १२ स्पीकर्सची ४२० वॉट क्षमतेची सोनॉस ध्वनियंत्रणा, पॅनोरॅमिक सनरूफ आणि नऊ एअरबॅग्ज ही अन्य वैशिष्ट्ये आहेत. अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि आपत्कालीन ब्रेक साहाय्य यासारख्या सुविधाही देण्यात आल्या. हे वाहन पाच बाह्य रंगांत आणि दोन अंतर्गत रंगसंगतींत उपलब्ध आहे. कंपनीने विस्तारित वॉरंटी, देखभाल पॅकेज आणि दीर्घ मुदतीच्या वित्तपुरवठ्याचे पर्यायही दिले आहेत. कंपनीने १० वर्षांपर्यंतचे सर्व्हिस व्हॅल्यू पॅकेज व एक्सटेंडेड वॉरंटी जाहीर केली असून, ५१.९९ लाख रुपये प्रारंभिक किंमत आहे. संभाजीनगरातून जागतिक दर्जाची लक्झरी कार तयार झाल्याने मराठवाड्याच्या औद्योगिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com