औरंगाबाद: कोविडच्या रुग्णांसाठी आता एक हजार खाटा

घाटीत सुविधांत वाढ :बालकांसाठी ६० खाटा
औरंगाबाद: कोविडच्या रुग्णांसाठी आता एक हजार खाटा
sakal
Updated on

औरंगाबाद: घाटीत कोविडच्या सुरुवातीला २०८ खाटा होत्या. त्यात वाढ करुन आता क्षमता एक हजारपर्यंत वाढविण्यात आली. यात बालकांसाठी ६० खाटा असन व्हेंटीलेटर्सची संख्या ७८ वरुन ३०८ वर पोचली आहे. ऑक्सिजनची क्षमता ५३ किलोलिटरपर्यंत झाली असून अजूनही ऑक्सिजन प्रकल्पासाठी घाटी प्रयत्नशिल आहे.

औरंगाबाद: कोविडच्या रुग्णांसाठी आता एक हजार खाटा
औरंगाबाद: एनए ४४ प्लॉटच खरेदी करा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे रुग्णसेवेसाठी आवश्यक ऑक्सिजन व ‘एमजीपीएस’ सिस्टीम बाबत आढावा अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. कोविडसाठी पूर्वी उपलब्ध सोयीसुविधा व सद्यस्थितीपर्यत उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत आढावा घेण्यात आला.

ऑक्सीजन पुरवठाधारक सागर गॅसेस यांनी कोविड काळात मोठा संसर्ग फैलावला असताना ऑक्सीजनचा पुरवठा अविरत ठेवल्याबाबत तसेच श्री. जहागिरदार यांनी कोविडमध्ये ऑक्सीजन पाईपलाईन वेळेवर केल्याने कोविड रुग्णांना रुग्णसेवा देण्यात मदत मिळाली. यामुळे अधिष्ठातांनी आभार मानले.

"महामारीच्या सुरुवातीला कोविड चाचणीसाठीचे नमुने तपासणी पुणे येथे केली जात होती. परंतु घाटीत ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. प्रयोगशाळेची आताची क्षमता दोन हजार नमुने प्रती दिवस आहे. घाटीत एकूण १५ हजारांपेक्षा जास्त कोविड आजाराने अतिगंभीर स्वरुपातील रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.’’-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com