esakal | वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू

वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैजापूर/शिऊर (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील Vaijapur शिऊरकडून बोरसरकडे मोटारसायकलवरून जाणाऱ्या बोरसर येथील तिघांचा रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला. त्यांना गावकरी व नातेवाईकांच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून त्यातील दोन जणांना मृत घोषित केले. एक गंभीर जखमी असल्याने त्याला औरंगाबाद Aurangabad येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सदरील अपघाताची घटना ही वैजापूर तालुक्यातील शिऊर हद्दीत घडली असून सदरील तिघेही विवाहित हे बोरसर येथील रहिवासी आहे. सुनील ओमकार डुकरे (वय ३४), श्रावण भागीनाथ मोरे (३५) असे मृतांचे, तर धोंडीराम बाबासाहेब सोनवणे असे जखमीचे नाव आहे.aurangabad accident news two youths died in vaijapur tahsil

हेही वाचा: शासनाने व्यापाऱ्यांचा अंत पाहू नये, व्यापारी महासंघाचा इशारा

सोनवणे यांना औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेने बोरसर गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरखजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटीळक पोलिस हेडकाँन्स्टेबल आर.आर.जाधव, पोलिस नाईक बकले यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वैजापूर येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

loading image