Aurangabad : ट्रकचालकाला लुटमारे आरोपी जेरबंद

आयशर चालकाला जीवे मारण्याची धमकी
Police
Policesakal

जायकवाडी : आयशर चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळचे सात हजार रुपये घेऊन फरार झालेल्या दोन आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या पाच तासात जेरबंद केले. कैलास सोलाट, रामेश्वर मिसाळ (दोघे रा. कातपूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (ता.१२) रात्री आठच्या सुमारास कातपूर गावाच्या नदीजवळ उत्तर प्रदेश येथून आलेल्या आयशर (क्र.यूपी-३७ एटी-०२३५) आरोपी कैलास सोलाट, रामेश्वर मिसाळ दोघांनी अडवले व जिवे मारण्याची धमकी देऊन चालक शहजान जमील मोहम्मद (वय ३०, रा.कमलापूर उत्तर प्रदेश) यांच्या खिशातून सात हजार रुपये घेऊन फरार झाले.

याप्रकरणी चालक शहजान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार रात्री ९ च्या सुमारास दिली. पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास आरोपी कैलास सोलाट, रामेश्वर मिसाळ या दोघांनाही अटक केले. त्यांनी दोन्ही आरोपींना पैठण न्यायालयात हजर केले असता त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई सपोनि. भागवत नागरगोजे, फौजदार दिलीप चौरे, पोलिस नाईक राहुल मोहोतमल, शफिक शेख, राजेश सोनवणे, दिनेश दाभाडे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com