
औरंगाबाद : ठेकेदाराच्या कार्यालयावर हल्ला; दोघांना अटक
वैजापूर : तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदापात्राच फिल्मीस्टाईल मजुरांसह ठेकेदाराच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
धर्मेंद्र त्रिभुवन, विजय त्रिभुवन (दोघे रा.वैजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदावरीतील वाळूपट्ट्याचा महसूल प्रशासनाने लिलाव करून हा वाळूचा ठेका दिला आहे. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदापात्रात हे वाळूयुध्द अचानक पेटले अन् जवळपास २५ जणांच्या टोळक्याने मजुरांवर अंदाधुंद दगडफेक सुरू केल्याने मजूर सैरभैर झाले व वाट मिळेल तिकडे पळू लागले. एवढेच नव्हे या टोळक्याने ठेकेदाराच्या कार्यालयावरही दगडांसह लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून तोडफोड केली. यात कार्यालयासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान झाले होते. तसेच मजूरही या घटनेत जखमी झाले होते.
हल्लेखोरांचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे त्यांनी कार्यालयातील डिव्हीआर व एलईडी स्क्रीन घेऊन पोबारा केला. याप्रकरणी २५ जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी वैजापूर येथील धर्मेंद्र त्रिभुवन व विजय त्रिभुवन या दोघांना २ मे रोजी पकडून अटक केली असून दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Web Title: Aurangabad Attack On Contractor Office Accused Arrested Babhulgaon Ganga
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..