शाळेचा पहिला दिवस...विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळाली ६१ लाख पुस्तके

चार जिल्ह्यांत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आज वितरण
61 lakh books Distribution
61 lakh books Distributionsakal

औरंगाबाद : बालभारतीच्या विभागीय भांडारातून ९ ते ३१ मेदरम्यान ६१ लाख ३२ हजार १७६ पुस्तके औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली या चार जिल्ह्यांतील समग्र शिक्षा अभियानाच्या भांडारगृहांमध्ये पोचली आहेत. त्यांचे वितरण शाळांतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज करण्यात येणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या शासकीय व अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे संच दिले जातात. मागील वर्षी कोरोनामुळे पुस्तक छपाई, प्रिंटिंगला लॉकडाउन, निधी अशा कारणांमुळे अनेक अडथळे आले होते. पंरतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बालभारतीकडून नियोजित वेळेत पाठ्यपुस्तकांची छपाई पार पडली होती. त्यामुळे समग्र शिक्षाकडून ज्याप्रमाणे पुस्तकांची मागणी करण्यात आली त्यानुसार बालभारतीने वेळेत पुस्तकांचे यशस्वीपणे वितरण केले.

आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे एकूण ६१ लाख ३२ हजार १७६ प्रतींची नोंदणी केली होती. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण नियोजन वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार बालभारतीच्या औरंगाबाद विभागीय केंद्रावरून ९ ते ३१ मेदरम्यान नोंदणी केलेले पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर वितरण करण्याचे आव्हान होते. मात्र, नियोजित वेळेत विनाअडथळा बालभारतीकडून विभागातील सर्व जिल्ह्यांना व्यवस्थित पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. यासह सर्व इयत्तांचे पुस्तके तयार असून विक्रेत्यांसह आवश्यक असणाऱ्या संस्थांमध्येही पुस्तकांचे वितरण बालभारतीकडून करण्यात येत असल्याचे भांडार व्यवस्थापक एस. एम. पवार यांनी सांगितले.

स्वाध्यायपुस्तिका, प्रात्यक्षिक नोंदवही

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीमार्फत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी विषयांच्या स्वाध्यापुस्तिका तसेच सातवी ते बारावीसाठी कार्यपुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तिकांवर आधारित लेखनाचा सराव करणे, बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने हे साहित्य उपयुक्त ठरणार आहे. सदर स्वाध्यायपुस्तिका व कार्यपुस्तिका औरंगाबाद विभागाच्या भंडारामध्ये उपलब्ध आहे. शाळा व विद्यार्थ्यांनी उपलब्धतेसाठी बालभारतीच्या विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालभारतीकडून पुस्तकांचे एकूण वितरण

  • मनपा औरंगाबाद ः ७ लाख २१ हजार ६५०

  • जि.प. औरंगाबाद ः १७ लाख ६६ हजार ६९९

  • हिंगोली ः ७ लाख ५६ हजार ८०३

  • बीड ः १८ लाख ६७ हजार ३९६

  • जालना ः १० लाख १९ हजार ६२८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com