esakal | Aurangabad : बीबी-का-मकबराची जमीन अबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

COURT

Aurangabad : बीबी-का-मकबराची जमीन अबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : बीबी-का-मकबरा जवळच्या जमिनीच्या मनाई हुकुमाचा दावा सहदिवाणी न्यायालयाने २९ जुलैला फेटाळला होता. त्या आदेशास आव्हान देणारे अपील जिल्हा न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांनी फेटाळले.

‘बीबी-का-मकबरा लगतची जमीन सिटी सर्व्हे क्र. १७२, ही ८८ आर जमीन निजाम काळापासून आमची वडिलोपार्जित मिळकत असून, मी त्या मिळकतीचा वारसाहक्काने पट्टेदार आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने माझ्या उपरोक्त मिळकतीत व कब्जात हस्तक्षेप करू नये’, असा मनाई हुकूम देण्याची विनंती जयराज पांडे यांनी दिवाणी न्यायालयात केली होती. पुरातत्त्व विभागातर्फे ॲड. रामदास भोसले यांनी श्री. पांडे यांच्या दाव्यास विरोध केला होता. १९५१ मध्ये मराठवाड्यातील ऐतिहासिक वास्तू (मॉन्युमेन्ट) आणि त्यालगतची जमीन भारतीय पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द केली होती.

तेव्हापासून आजपर्यंत शहर भूमापन कार्यालयातील पी. आर. कार्ड आणि चौकशी रजिस्टरमध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नावाची नोंद आणि मालकी हक्क आहे. वादी अतिक्रमणधारक असल्याचा युक्तिवाद केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने मनाई हुकुमाचा दावा खारीज केला होता. त्याविरोधात जयराज पांडे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. जिल्हा न्यायालयाने ५ ऑक्टोबरला अपील खारीज केले आहे.

loading image
go to top