Bike Accident: धुळे सोलापूर महामार्गावर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने कावासाकी बाईकस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
Accident News: धुळे-सोलापूर महामार्गावर फतियाबाद जवळ दुचाकी आणि ट्रॉलीच्या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
माळीवाडा : धुळे-सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना फतियाबाद गावाच्या बस थांब्याजवळ रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.