esakal | Bird Flu: शेकडो गावरान कोबड्या मृत; बर्ड फ्लू रोगाचा शिरकाव झाल्याच्या शक्यतेने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

poultry

पशुसंवर्धन तालुका सर्व लघु चिकित्साल्याचे वैद्यकीय टिमने पाहणी करून पाच मृत कोंबड्या पुणे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवल्या आहेत.

Bird Flu: शेकडो गावरान कोबड्या मृत; बर्ड फ्लू रोगाचा शिरकाव झाल्याच्या शक्यतेने खळबळ

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (औरंगाबाद): जायकवाडी प्रकल्पग्रस्त अमरापूरवाघुडी (ता.पैठण) येथे शेतीला जोडधंदा करणाऱ्या अल्पभूधारक शेतक-यांच्या शेकडो गावरान कोबड्या मृत पावल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाचा शिरकाव झाल्याची शक्यतेने खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन तालुका सर्व लघु चिकित्साल्याचे वैद्यकीय टिमने पाहणी करून पाच मृत कोंबड्या पुणे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवल्या आहेत.

आधी कोरोना कालावधीत कोंबडी पालकांना मोठा फटका बसला होता. अनलॉकनंतर पुन्हा राज्यात बर्ड फ्लू रोग शक्येतेने पक्षी दगावत असल्याचे चर्चेला ऊधान आले असताना पैठण तालुक्यातील अमरापूरवाघुडी येथे जायकवाडी जलफुगवटा परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून गावरान कोंबडी पालन करणारे अल्पभूधारक शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांच्या शुक्रवार (ता.१५) व शनिवार ( ता.१६) या दोन तीन दिवसात जवळपास १६३ कोबड्या दगावल्याने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांची माणुसकी! अंधश्रध्देला कंटाळून घर सोडणाऱ्या तरुणीला भेटवलं 'आई'शी

दरम्यान अचानक पक्षी दगावत असल्याने शिदे यांनी ही बाब पशुवैद्यकीय डॉ. राजेश दांगट, डॉ. विठ्ठल पाबळे यांना शनिवारी कळविली असता दुपारून तालुका लघु चिकित्सा उपआयुक्त डॉ. श्रीनिवास भुजंग,डॉ. गौतम साळवे, डॉ. योगेश किर्जत, यांच्या टिमने कोबडी गोठ्यवर भेट देवून पाहणी केली. त्यावेळी शिल्लक लहान मोठे ५५ कोंबड्यासाठी पाण्यातून औषधी, बंदिस्त शेड निर्जंतुकीकरण करण्याचा उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करत पाच दगावलेल्या कोबड्या पुणे येथील प्रयोगशाळेत वैद्यकीय तपासणीसाठी पाठल्या आहे. अचानक दोन तीन दिवसांत शेकडो कोबड्या दगावल्याने परिसरातील कोबडी पालकात चिंता निर्माण होऊन खळबळ उडाली आहे.

आधी कोरोना लाँकडाऊन त्यानंतर अतिवृष्टीने पिकाची वाट लागली असताना कुटूंबाचा गाडा चालवण्यासाठी गावरान कोबडी पालणातुन उदरनिर्वाह चालवत होतो. परतू अचानक कोबड्या गेल्याने मोठे नुकसान झाले- भाऊसाहेब शिदे.

(edited by- pramod sarawale)

loading image