esakal | अखेर क्लासेसचा मार्ग मोकळा! अनलॉक होताना पाळावे लागणार कोरोनाचे नियम
sakal

बोलून बातमी शोधा

class

कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या खासगी शिकवण्या सुरू करण्यास अखेर महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे

अखेर क्लासेसचा मार्ग मोकळा! अनलॉक होताना पाळावे लागणार कोरोनाचे नियम

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या खासगी शिकवण्या सुरू करण्यास अखेर महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून सोमवारपासून (ता. 15) शिकवण्या सुरू करण्यात याव्यात असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात लॉकडाऊनमध्ये संपूर्ण व्यवहार ठप्प होते. दरम्यान गेल्या काही महिन्यांत कोरोना संसर्ग कमी होत आहे. रुग्ण संख्या घटताच शासनाने मिशन बिगेन अगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी परवानगी दिली.

'राज्यातील रखडलेल्या रस्त्याच्या कामांना कंत्राटदार जवाबदार'

5 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. असं असलं तरी खासगी शिकवण्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे खासगी शिकवण्या सुरू करण्यासाठी परवानगी मिऔळावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार प्रशासक श्री. पांडेय यांनी सोमवारी यासंदर्भात आदेश काढले आहेत. 

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांना आंदोनलनादरम्यान शिवीगाळ; भाजप...

अशा आहेत अटी-

शिकवण्या सुरू करण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्र घ्यावे लागेल. शासन व महापालिकेतर्फे काढण्यात येणार्या आदेशाचे पालन करावे लागेल. नियमांचे पालन न करणार्या शिकवणीचे वर्ग बंद केले जातील, असा इशारा प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image