esakal | किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार

बोलून बातमी शोधा

kirit somayya

सचिन वाझे घोटाळा दोन हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे

किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: सचिन वाझे वसुली प्रकरणावरून अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिला. यापूर्वी संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता पुढील नंबर हा परिवहनमंत्री अनिल परब यांचा आहे. अशाच प्रकारे आघाडी सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनाही घरी जावे लागेल, असा दावा भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (ता.५) पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, वाझे घोटाळा हा २ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

किरीट सोमय्या हे सोमवारी (ता.५) शहराच्या दौऱ्यावर होते. सकाळी दहा वाजता त्यांनी घाटी, मिनी घाटी रुग्णालय व कोविड केअर सेंटर्संना भेट दिली. यादरम्यान आयोजित पत्रपरिषदेत सोमय्या म्हणाले, की अनिल देशमुखप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी. राज्यात वाझे गँगच्या माध्यमातून वसुली सुरु असल्यामुळे दुसरीकडे व्हेटिलेंटर, ऑक्सीजन या गोष्टीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचाही आरोपही त्यांनी केला.

चक्क तलवारीने खाऊ घातला केक! बहाद्दरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाझे टीमने टीआरपी घोटाळा, बुकीकडून केलेले कलेक्शन, अनेकांनी ड्रग्ज घेत असल्याबाबत समन्स पाठवणे, एवढेच नव्हे तर, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारांतून दोन हजार कोटींचे कलेक्शन केले असून हा पैसा अनिल देशमुखांनी स्वत:कडे ठेवला की, त्यांच्या पक्षाच्या खात्यात जमा केला, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे.

Aurangabad Lockdown: जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व दुकाने आजपासून बंद

टीआरपीच्या नावाखाली अस्तित्वात नसलेल्या वाहिन्याच्या नावे १ हजार कोटींच्या घोळ केला. शिवाय वाझे यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशिररित्या केली. त्यांच्या नियुक्तीची फाईलही मंत्रालयातून गायब झाल्याचा गौप्यस्फोटही सोमय्या यांनी केला. या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अनिल मकरिये, संजय केणेकर, समीर राजूरकर, भगवान घडामोडे आदींची उपस्थिती होती.