कन्नडमध्ये गादी घराला लागली आग, लाखोंचे नुकसान

Set Fire Wholesale Shop In Kannad
Set Fire Wholesale Shop In Kannad
Updated on

कन्नड(जि.औरंगाबाद) : कन्नड शहरातील समर्थनगर येथील गादी घराला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (ता.नऊ) घडली. शहरातील दस्तगीर मंसुरी यांचा शहरात गादी, ताडपत्री व इतर साहित्याचा मोठा व्यवसाय आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गादी घराला आग लागली. त्यात हजारो नवीन गाद्या, कापूस, लग्नसराईसाठी विक्रीसाठी आणून ठेवलेल्या रग, दुलई, पावसाळी हंगामासाठी आगाऊ स्टोअर करून ठेवलेले प्लास्टिक कागद, ताडपत्रीसह इतर साहित्य जळून खाक झाले.

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या ठिकाणाहून आगीचे व धुराचे मोठे लोळ उठत होते. परिसरातील नागरिकांनी मिळेल तेथून पाणी उपलब्ध करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत दोघांना किरकोळ जखमा वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kunbi certificate latest update Maharashtra
New Harsul Development
Children, Smartphones and Mental Health: Why Parents Need to Take Mobile Addiction Seriously
Chandgude Family Tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com