औरंगाबाद ब्रदरची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या | commits suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

commits suicide by hanging himself
औरंगाबाद ब्रदरची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद ब्रदरची रुग्णालयातच 'गळफास' घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : खासगी रुग्णालयात ब्रदर म्हणून काम करत असलेल्या २९ वर्षीय तरुणाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या (commits suicide by hanging himself) केली. हा प्रकार ७ जानेवारी रोजीच्या पहाटे अडीच वाजेदरम्यान समोर आला. किशोर राजू लहाने (२९, रा. मुकूंदनगर, मुकूंदवाडी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा: शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमचा हार

याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार किशोर हा टिळकनगरातील एका रुग्णालयात सहा ते सात महिन्यांपासून ब्रदरचे काम करत होता. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान तो ड्यूटी करुन घरी गेला होता. पून्हा रात्री अचानक आला, आणि पहाटे अडीच्या सुमारास

त्याने रुग्णालयातील कपडे वाळविण्याच्या ठिकाणी पत्र्याच्या छताच्या लोखंडी ॲंगलला नायलॉन दोरीने गळफास घेतला. त्याला लखन राजू लहाने आणि शार्दूल

हेही वाचा: नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा

कुलकर्णी यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पहाटे ३ वाजून ५५ मिनीटांनी मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अंमलदार संजय सिरसाट करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top