
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून केला आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला. मृत व्यावसायिकाचे नाव शेख कदीर शेख करम (वय ४०) असे असून, ते मिसारवाडी येथील रहिवासी होते. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर तिघे फरार आहेत.