
औरंगाबाद : संस्थान गणपतीचे दर्शन घेणारे शिंदे चौथे मुख्यमंत्री
औरंगाबाद - शहराचे ग्रामदैवत असलेले संस्थान गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता दर्शन घेतले. संस्थान गणपतीचे दर्शन घेणारे ते चौथे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख यांनी संस्थान गणपतीचे दर्शन घेतले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणारा औरंगाबाद शहरात अनेक नेतेमंडळी आले असता ते संस्थान गणपतीचे दर्शन घेतात. यामुळे संस्थान गणपतीची एक वेगळी ओळख आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संस्थान गणपतीला सोन्याचा मुकुट अर्पण केला होता अशी माहिती संस्थान गणपतीचे विश्वस्तांनी दिली.
दरम्यान, मोरेश्वर सावे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नवस फेडण्यासाठी म्हणून बाळासाहेब ठाकरे किराणा चावडीपासून संस्थान गणपतीपर्यंत पायी चालत आले होते. याच भागात असलेल्या जैन मंदिरात जाऊन शिंदे यांनी दर्शन घेतले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेच्या सर्वात मोठे नेत्यांनी संस्थान गणपतीचे दर्शन घेतल्याची माहिती या भागातील नागरिक उदय भाटी, गजेंद्र सिद्ध यांनी दिली. तसेच इतिहासात लोकमान्य टिळक यांनी देखील संस्थान गणपतीचे दर्शन घेतल्याचे या भागातील नागरिक सांगतात.
Web Title: Aurangabad Chief Minister Eknath Shinde Visit Sansthan Ganapati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..