औरंगाबाद : शाळेसाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Chikalthan Students

औरंगाबाद : शाळेसाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

कन्नड : चिकलठाण येथील गांधारी नदीवर पूल नसल्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर येथे पूल बांधणार का असा सवाल पालकांनी व्यक्त केला आहे.

चिकलठाण व खुलताबाद सीमेवर गांधारी नदी असून या नदीवर नळकांडी पूल होता. मात्र, तो पुराने वाहून गेल्याने शेतवस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलठाण जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणे जाणे करावे लागते. या नदीला डोक्याच्यावर पाणी आहे. त्यामुळे पालकांना एक लाकडी बल्लीचा आधार घेतला विद्यार्थ्यांना नदी पार करून द्यावी, लागत आहे. चक्क लाकडी बल्ली धरून लोंबकळत विद्यार्थी नदी पार करतात. चुकून एखाद्या विद्यार्थ्याचा हात निसटला तर ते जिवावर बेतू शकते.

चिकलठाण ते खुलताबाद सिमेवरील शेतवस्ती अशी दररोज दीड किलोमीटर जीवघेणी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनासह येथील लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे त्वरित पूल उभारण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा उद्योजक मनोज पवार, राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब थोरात यांनी दिला आहे.

Web Title: Aurangabad Chikalthan Students School Road Construction Bridge Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..