पैठणमधील लोहगावात कोरोनाचा शिरकाव, ७९ पैकी पाच जण पाॅझिटिव्ह

Corona Test Lohgaon Paithan Taluka
Corona Test Lohgaon Paithan Taluka

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील लोहगाव येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने चार दिवसांपूर्वी आरटीपीसी चाचणी घेतलेल्या ७९ पैकी पाच जणांचा पाॅझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णाची पैठण तालुक्यात संख्या वाढल्याने प्रशासनाने अंशतः लाॅकडाऊन, विकेंडला शनिवार, रविवार, दोन दिवस कडकडीत बंद सारख्या उपाययोजना राबविण्यात येत असताना कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी गावागावात तालुका व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे मोठ्याप्रमाणात यंत्रणा काम करित आहे.

तसेच आरोग्य विभागाच्या सूचनेवरून लोकांची स्वॅब चाचण्याचा वेग वाढला असुन प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने लोहगावात मंगळवार (ता.२३)  वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन काळे, आरोग्य पर्यवेक्षक शिवाजी थोटे, अजय शेजुळ, विजय गायकवाड, परिचारिका उषा गायकवाड, आशा सेविका गोपिका बोरूडे यांच्या पथकाने जिल्हा परिषद प्रशालेत ७९ विविध छोटे-मोठे व्यवसायिक, हाॅटेल चालक व नागरिकांची आरटीपीसी स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. या कोविड चाचणी तपासणी अहवाल गुरूवार (ता.२५) आरोग्य विभागास प्राप्त झाला.

यात पाच जण पाँझिटिव्ह निघाल्याने आरोग्य पथकाने गुरुवारी संपर्कातील व इतर १५ जणाची आरटीपीसी चाचणी करून कोरोना बांधित कुटुंबाने घ्यावयाची काळजी, याबाबत वैद्यकीय पथक व  ग्रामपंचायतवतीने गावात मास्क वापर करणे, सँनिटायझर, आरोग्य सुरक्षा विषयी जनजागृती केली. यासाठी गणेश इथापे, दिलीप जगताप, ग्रामविकास अधिकारी नारायण पाडळे, नामदेव औटे, किरण वाघ,अविनाश इथापे, गणेश चव्हाण, इस्माईल शेख आदींनी पुढाकार घेतला.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com