वाळूजजवळ तरुण धक्कादायक अवस्थेत आढळला, क्षुल्लक कारण बेतले जीवावर

कल्याण हा बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी जाहिरातीबाई व जायफुल्या हे गेले असता.
कल्याण पवार
कल्याण पवार

वाळूज (जि.औरंगाबाद) : क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याचा राग आल्याने एका २५ वर्षीय तरुणाचे दोन्ही पाय तोडून व गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची घटना वाळूज जवळील येसगाव शिवारातील गणपती गायरानात शुक्रवारी (ता.३०) पहाटे बारा ते एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जाहिरातीबाई जायफुल्या पवार (वय ६०) ही महिला वाळूजजवळील येसगाव शिवारातील गणपती गायरानातील दहा एकर शेतीवर उदरनिर्वाह करते. त्यांना तीन मुली व चार मुले असून त्यातील विजय पवार याचा मृत्यू झाला आहे. पालम (जि.परभणी) येथे राहत असलेला विजयचा मुलगा राहुल याला शिवा महादू पवारने बोलावून घेतले व तुझे वडीलाकडे असलेली दहा एकर शेती तू घे, असे म्हणाला. त्यावर येत्या उन्हाळ्यात जमीन तुला कसण्यासाठी देऊ, असे जाहिरातीबाई यांनी सांगितले होते. गुरुवारी (ता.२९) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कल्याणची आत्या विमलबाई परदेशी चव्हाण हिला कल्याण म्हणाला की, तू दारू पिऊन मुलांमध्ये बसू नको.

कल्याण पवार
सांगा! तहान भागणार कशी?औरंगाबादेत दररोज दीडशे एमएलडी पाण्याची तूट

तू तुझ्या मुलांना घेऊन तुझ्या घरी थांब. येथे मुलांसोबत छेडखाण्या करीत बसू नको. असे कल्याण बोलल्यावर तिचा मुलगा अनिस कल्याणला म्हणाला की तू कुठला मोठा नेता आहे का? तू माझ्या आईला येथून जा. असे बोलतोस. त्यावर कल्याणने लाकडाचे टिपरुने विमलबाई व तिची मुलगी मंदाकिनी यांना मारहाण केली. यावेळी विमलबाईने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. भांडण झाले. त्यावेळी राहुल पवार, अनिस चव्हाण, केवल भोसले व पमु भोसले हे तेथे हजर होते. त्यानंतर राहुलने शिवा पवार यास फोन करून सांगितले की, कल्याण याने मारल्यामुळे विमलबाई चव्हाण बेशुद्ध पडली आहे. त्यानंतर शिवा पवार व वाळूज पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी सर्वजण तेथेच होते. थोड्याच वेळात विमलबाई चव्हाण उठून उभ्या राहिल्या. त्यानंतर पोलिसांनी जायफुल्या पवारला घेऊन चौकशीसाठी घेऊन गेले. सायंकाळी झापड पडल्यावर राहुल, अनिस, केवल, पमु हे वस्तीवर होते. यावेळी राहुलने धमकी दिली की, आज कोणीही भेटू द्या, त्याचा खूनच करेल. त्यामुळे घाबरलेल्यांनी मुलाबाळांना घेऊन मिट्टु पवारच्या घरी मुक्कामाला गेले. त्यानंतर वाळूज पोलिसांनी चौकशी करून जायफुल्याला सोडून दिल्याने तो रात्री उशिरा घरी आला. कल्याण हा बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी जाहिरातीबाई व जायफुल्या हे गेले असता. राहुल पवार याच्या वस्तीवर कल्याण पवार याचे दोन्ही पाय तोडून व गळा चिरून त्याला ठार मारल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी जाहिरातीबाई जायफुल्या पवार या महिलेच्या फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे करीत आहेत.

कल्याण पवार
ढिंग टांग : सुदर्शनचक्र वि. सूडचक्र!

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव : घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्यासह सहायक पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com