esakal | सिगारेट ओढण्यास मनाई केल्याने चाकूने भोसकले
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad crime news

या वादातून निखील बोर्डेने इमाद खान याच्या डोक्यात रॉड मारला. तसेच अजय व रावत यांनी लोखंडी पाईपने इरफान बेगला मारहाण केली

सिगारेट ओढण्यास मनाई केल्याने चाकूने भोसकले

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: घरासमोर सिगारेट ओढण्यास मनाई करणाऱ्‍या तरुणाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणात वेदांतनगर पोलिसांनी आरोपींपैकी एकाला शनिवारी (ता.३०) रात्री अटक केली. आकाश सुनील बोर्डे (रा. क्रांतीनगर) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

कोकणवाडी भागातील फारुक कुरेशी शेख चांद कुरेशी (३०) हे चितेगावातील कंपनीत कामाला आहेत. २९ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास मित्र इरफान बेग व इमाद खान यांच्यासोबत घराबाहेर बोलत असताना निखिल बोर्डे, अजय अभि रावत आणि अजय खरात हे तेथे आले. तिघेही कुरेशी यांच्या घरासमोर सिगारेट ओढू लागल्याने त्यांना विरोध केला. त्यावरुन कुरेशी आणि चौघांमध्ये वाद झाला.

Budget 2021: नवी उभारी देणारी घोषणांची बजेटमधून अपेक्षा

या वादातून निखील बोर्डेने इमाद खान याच्या डोक्यात रॉड मारला. तसेच अजय व रावत यांनी लोखंडी पाईपने इरफान बेगला मारहाण केली. तर अजय खरात हा इमाद खानला चाकू मारत असताना कुरेशी यांना हातावर वार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला जबर जखम झाली. यावेळी तेथे आलेल्या आणखी पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी व दगडफेक केली. हा प्रकार सुरू असताना कुरेशी व त्यांचा आणखी मित्र अश्रफ उमर खान यांनी जमाव पांगवला. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लातुरातील आग शॉटसर्किटमुळेच; पालकमंत्र्यांकडूनही चौकशीचे आदेश

पोलिस कोठडीत रवानगी- 
संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, संशयिताला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी रविवारी (ता.३१) दिले. सुनावणीदरम्यान सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे जप्‍त करणे आहे. गुन्हा करण्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

(edited by- pramod sarawale)

loading image