esakal | पीरबावडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत जवळपास 10 ठिकाणी चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

theft in pirbavda

वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीतील टाकळी कोलते येथील शिक्षक रामकृष्ण सुलताने यांचे घर फोडले

पीरबावडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत जवळपास 10 ठिकाणी चोरी

sakal_logo
By
बाबासाहेब ठोंबरे

पीरबावडा (औरंगाबाद): पीरबावडा (ता.फुलंब्री) परिसरात (ता.08) रोजी चोरट्यांनी धुमाकूळ घालत जवळपास 10 ते 12 ठिकाणी घरातील व काही दुकाने फोडत धुमाकूळ घातला. वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीतील टाकळी कोलते येथील शिक्षक रामकृष्ण सुलताने यांचे घर फोडले. या घरातून रोख रक्कम अंदाजे वीस हजार रुपये, सोन्याची नथ चोरीस गेल्याचे समजते.

तसेच सुभाष तुकाराम कोलते, जगन्नाथ सूर्यभान कोलते, यांच्या घराचे कुलूप तोडून समान अस्ताव्यस्त करीत रोख रक्कम जे असेल ते उचलत चोर पसार झाले. तसेच टाकळी कोलते येथून तीन किलोमीटर असलेल्या धानोरा येथे सुद्धा पाच ठिकाणी चोरी केली. त्यात गौरव ऍग्रो एजन्सी या दुकानाची कुलूप तोडून गल्ल्यात असलेले अंदाजे दोन हजार रुपये घेऊन पोबारा केला.

Gram Panchayat Election: पती - पत्नीच्या हाती गावच्या विकासाची डोरी

याच गावातील आर्यन किराणा दुकानातून काही बिडीचे बंडल व थोडीफार रोख रक्कम पसार केली.येथीलच वसंत सोळुंके, सर्जेराव सोळुंके, संपत सोळुंके या तिघांच्या घरातील सुद्धा सामान अस्ताव्यस्त करीत हाती लागेल ती रोख रक्कम चोरून नेल्याचे समजते. धानोरा येथून चार किलोमीटर असलेल्या बदनापूर तालुक्यातील नांदखेडा येथील डॉ.जगदीश पाटील हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असतांना त्यांच्या घरात असलेले सोन्याचे दागिने व अंदाजे पंधरा हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समजते.

बस वळविण्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराची एसटी चालकाला मारहाण

शिवाय नव्याने फुलंब्री तालुक्यात आलेले व परंतु हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तळेगाव येथील बाबासाहेब पवार यांचे कोंडीबाबा कृषी सेवा केंद्राचे शटर उचकाऊन या दुकानात असलेली अंदाजे तीन हजार रुपये रोख रक्कम पसार केली.एकाच रात्रीत जवळपास दहा ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी व ग्रामस्थ भयभीत झाले आहे. या घटनेमुळे वडोद बाजार,हसनाबाद व बदनापूर पोलिसांना एक प्रकारचे आव्हान निर्माण झाले आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image