तरुणाची झोपेतच कुऱ्हाडीने हत्या, फुलंब्री तालुक्यातील घटना

हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरवून संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली होती.
संदीप चव्हाण
संदीप चव्हाण

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री (Phulambri) तालुक्यातील बिल्डा शिवारात असलेल्या बेलदरा परिसरात एक बत्तीस वर्षीय तरुणाचा झोपेतच अज्ञात व्यक्तीने कुऱ्हारीने चार- पाच वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी (ता.20) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्वान पथकलाही पाचारण केले. मात्र श्वान सुमारे शंभर फुटातच घुटमळत राहिल्याने श्वानला माग काढता आला नाही. संदीप सुदाम चव्हाण (वय ३२, रा.बिल्डा, ता.फुलंब्री) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात (Phulambri Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी चार संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील (Aurangabad) बिल्डा शिवारातील बेलदारा परिसरात सुदाम चव्हाण यांची शेतजमीन आहे. त्यांना दोन मुले आहे. सुदाम चव्हाण व संदीप चव्हाण हे दोघे बाप-लेक शेतातच जेवले. व सुदाम चव्हाण हे झोपण्यासाठी गावात आले. तर संदीप हा शेडचे काम चालू असल्यामुळे शेतातच बाजीवर झोपला. संदीप हा गाढ झोपेत असतांना त्याचा अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने डोक्यात सपासप घाव केले.(Aurangabad Crime News Unkown Person Murdered Youth In Phulambri)

संदीप चव्हाण
CoronaUpdates : मराठवाड्यात नव्याने तीन हजार ८८८ जणांना कोरोनाची बाधा

यामध्ये संदीप हा गंभीर जखमी झाला. यानंतर संदीप हा बाजीवरून तडफडत उठून काही अंतरावर येऊन पडला. तोपर्यंत सकाळ झालेली होती. सकाळी याच परिसरात राहणारा अनिस पठाण याला संदीप चव्हाण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे दिसून आले. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आली. त्यामुळे अनिस पठणने आरडाओरडा केली. त्यांनतर परिसरातील नागरिक धावून आले. त्यावेळी संदीपची काही प्रमाणात हालचाल सुरू होती. संदीपची हालचाल सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी खाजगी वाहनाने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत संदीपची प्राणज्योत मावळली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदरील घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड, पोलिस निरीक्षक अशोक मुगदीराज, स्थानिक गुन्हे शाखेचे भागवत फुंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केलेला आहे.

श्वानपथक शंभर फुटातच घुटमळले

या तरुणांच्या हत्येचे गांभीर्य ओळखून श्वानपथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाने घटनास्थळापासून सुमारे शंभर फूट समोर असलेल्या नाल्यापर्यंत माग काढत जाग्यावरच घुटमळला. त्याचबरोबर बोटाचे ठसे घेणारे पथकही याठिकाणी आले होते. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरवून संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली होती. मात्र सायंकाळपर्यंत कुठलाही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. सदरील तरुणाची हत्या का करण्यात आली याबाबत तालुक्यात तर्कवितर्क सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com