औरंगाबाद: दारूच्या नशेत घृणास्पद क्रौर्य, खुनाची दिली कबुली

दारूच्या नशेत एकाचे क्रौर्य, खुनाची दिली कबुली
चाकूने १०० वार, डोळे काढून खेळला गोट्या!
चाकूने १०० वार, डोळे काढून खेळला गोट्या!sakal

औरंगाबाद : दोघेही एकमेकांच्या ओळखीचे. रात्री दारू पिले, नशा चढल्यानंतर ‘तू बडा, की मैं बडा’ म्हणत दोघांत किरकोळ वाद झाला. त्याच वेळेस घरून एकाला आईचा फोन आला. मात्र, मारेकऱ्याने दिला नाही. यातून दोघांत वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले अन् मारेकऱ्याने दारूच्या नशेत अबू बकर हबीब सालेह (४१, न्यू एसटी कॉलनी, गल्ली क्र.२, नेहरूनगर, कटकटगेट) याचा चाकूने तब्बल १०० वार करून खून केला. त्याचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही, तर त्याने त्याचे डोळे काढून रस्त्यावर गोट्या खेळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला १२ तासांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सय्यद समीर ऊर्फ स्टॉयलो सय्यद शौकत (२५, रा. अल्तमश कॉलनी) असे मारेकऱ्याचे नाव आहे.

जळगाव रस्‍त्यावरील गरवारे कंपनीजवळील कारच्या शोरूमजवळ रस्त्‍याच्या कडेला झाडाझुडपात एक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याचे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकाला दिसला. नागरिकाने पोलिसांना कळविताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणीनंतर मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

चाकूने १०० वार, डोळे काढून खेळला गोट्या!
T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

अशी पटली ओळख

अनोळखी मृतदेह आढळल्याची आणि क्रूरपणे खून केल्याची माहिती जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना मिळाली. सदर अनोळखी मृतदेह अबू बकरचा असल्याची ओळख केंद्रे यांना पटली. दरम्यान, केंद्रे यांनी अबू बकरचा कोणाशी वाद होता का याची माहिती घेत संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये आरोपी सय्यद हाही होता. त्याला ताब्यात घेताच त्याने आपण एकट्यानेच खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मृताचा मोबाइलही जप्त करण्यात आला. दरम्यान सय्यद याला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मृत अबू बकरविरोधात जिन्सी ठाण्यात याआधी मारामारीचे काही गुन्हे दाखल असल्याचीही माहिती निरीक्षक केंद्रे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

असा केला खून

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अबू बकर आणि आरोपी सय्यद हे दोघेही कायम नशेत असत. मंगळवारी (ता.९) रात्री दोघांनी दीडपर्यंत आंबेडकरनगर परिसरातील झोपडपट्टी भागात दारू पिली. दोघांत वाद झाला. दरम्यान अबू बकरच्या आईचा फोन येत होते. त्याचवेळी सय्यदने त्याचा मोबाइल काढून घेतला आणि ‘मै बोलूंगा तभीच कॉल लेने का’ असे नशेत म्हणाला. दोघांनी देशी दारू प्राशन केली होती.

चाकूने १०० वार, डोळे काढून खेळला गोट्या!
पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

मात्र अबू बकरने न ऐकल्याने सय्यदने अबू बकरवर तब्बल १०० वार केले. नंतर अबू बकरचे डोळे काढून चक्क रस्त्यावर गोट्या खेळलो, अशी कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. देशी दारू कुठून खरेदी केली याविषयीही त्याने पोलिसांना सांगितले. खून करून अबू बकरचे मोबाइलसह इतर साहित्य २५ फूट अंतरावर फेकून दिले. अबू बकरच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके स्थापन केली होती. आरोपी सय्यदला निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलिस अंमलदार संपत राठोड, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण, नंदुसिंग परदेशी, संतोष बमनात, ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी अटक केली. त्याला एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मांटे हे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com