औरंगाबाद : मुलाने केले पित्या वर तलवारीने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

औरंगाबाद : मुलाने केले पित्या वर तलवारीने वार

औरंगाबाद : सुनेच्या माहेरचे घरगुती वाद मिळविल्यानंतरच सुनेला माहेरी पाठवीन अशी भूमिका घेतलेल्या पित्याला मुलाने तलवारीने भोसकले. यात पिता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मुलाने बहिणीलाही गंभीर मारहाण केली. विशेष म्हणजे तिच्यावर केला जाणारा तलवारीचा वार पित्याने झेलल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. हा प्रकार ३ जुलैच्या दुपारी रहिमनगरात घडला.

पिता शेख इरफान शेख गफार (४३, रा. रहिमनगर, अल्तमश कॉलनी, गल्ली क्र. ७) असे गंभीर जखमी पित्याचे नाव आहे. त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पत्नी शाहिस्ता बी, मुलगा आमेर शेख (२१), सुन आदिबा (१८), लहान मुलगी (९) एकत्र वास्तव्यास आहे. शेख हे भंगार स्क्रॅपचा व्यवसाय करतात. ३ जुलै रोजी ते घरी असताना सकाळी मुलगा आमेरच्या सासूने शेख यांना फोन करून मुलगी आदिबाला माहेरी पाठवा असे सांगितले. दरम्यान, तुमच्या घरातील वाद आधी मिटवा नंतरच सुनेला माहेरी पाठवीन अशी भूमिका शेख यांनी घेतली.

दरम्यान, ११ वाजता मुलगा आमेरचा मेव्हणा अझर शेख यांच्या घरी येऊन आपण बहिणीला घ्यायला आल्याचे म्हणाला, त्यावेळी शेख यांची माहेरी आलेली विवाहित मुलगी सना ही अझर यांना समजून सांगत असताना आमेरने तिथे येऊन सना हिला जोरजोराने शिवीगाळ करत तिसऱ्या मजल्यावर जाऊन त्याने तलवार घेऊन आला. आणि सना हिच्यावर वार करणात तितक्यात शेख यांनी हाताच्या मनगटावर वार अडविला.

दरम्यान शेख हे दवाखान्यात जाण्यासाठी निघाले असतानाच आमेरने पुन्हा पाठीमागून पळत येऊन पिता शेख इरफान यांच्या डोक्यावर, पाठीवर वार केले आणि तो पळून गेला. त्यानंतर शेख यांचे भाऊ इमरान यांच्यासह जमलेल्या लोकांनी शेख यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे, नंदू चव्हाण, बाशिद पटेल, शेख जफर, संतोष शंकपाळ यांच्या पथकाने तत्काळ आमेर याला बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Aurangabad Crime Son Attack On Father By Weapon Altamash Colony

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top