महिलेच्या फेसबुकवर पाठविला अश्लिल फोटो, नंतर म्हणाला सॉरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad cyber crime update Sent obscene photos of woman on Facebook

महिलेच्या फेसबुकवर पाठविला अश्लिल फोटो, नंतर म्हणाला सॉरी...

औरंगाबाद : महिलेच्या फेसबुक खात्यावर अश्लिल फोटो पाठवून दुसऱ्या दिवशी माफी मागणाऱ्या मवाल्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बोरसे (रा. पिसादेवी, पळशी रस्ता, अंजनडोहगाव) असे मवाल्याचे नाव आहे. उस्मानपुरा चौसरनगर भागात एका ३५ वर्षीय महिलेचे ब्युटी पार्लर आहे.

तिच्या मोबाईलमधील फेसबुक खात्यावर २७ मार्च रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बोरसेने अश्लिल फोटो पाठवला. त्यानंतर २८ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने महिलेला मेसेज पाठवत चुकून फोटो पोस्ट झाल्याचे सांगितले. तसेच महिलेची माफी देखील मागितली. त्यावेळी महिलेने त्याला चांगलेच खडसावले. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी देखील त्याने अश्लिल फोटो पाठवला होता. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे या करत आहेत.

Web Title: Aurangabad Cyber Crime Update Sent Obscene Photos Of Woman On Facebook

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top