
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याला पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या कार्यालयातील महसूल सहायकाला देखील ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. वर्ग दोनची जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी चालान जनरेट करण्यासाठी ही लाच घेण्यात आली. आरोपी खिरोळकर याच्या घराची झडती घेतली असता, दागिन्यांसह ६७ लाखांचे घबाड सापडले.