औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात धावल्या २४ शिवशाही, २३ लालपरी

बसच्या १५४ फेऱ्यांमधून तीन हजारांवर प्रवाशांचा प्रवास
Aurangabad district During the day Run 24 Shivshahi 23 Lalpari
Aurangabad district During the day Run 24 Shivshahi 23 Lalparisakal

औरंगाबाद : एसटी(ST)महामंडळातर्फे शनिवारी (ता. १८) ५४ एसटी बसच्या १५४ फेऱ्या करण्यात आल्या. या बससेवेमुळे तीन हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-पुणे (Aurangabad-Pune) मार्गावर १७ शिवशाहीच्या (Shivshahi) माध्यमातून साडेसहाशे प्रवाशांनी प्रवास केला. २१ चालक आणि ३० वाहक, चार चालक कम वाहक अशा एकूण ५५ कर्मचाऱ्यांनी शनिवारी सेवा बजावली.

Aurangabad district During the day Run 24 Shivshahi 23 Lalpari
जळगाव : मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी

रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात सेवा पुरवण्यात येत आहे. शनिवारी औरंगाबाद पुणे मार्गावर शिवशाहीच्या १७ बसच्या माध्यमातून १७ फेऱ्या करण्यात आल्या असून ६५२ प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. तर औरंगाबाद नाशिक मार्गावर पाच शिवशाही चालवण्यात आल्या. त्याचप्रमाणे औरंगाबाद आगारातून कन्नड मार्गावर दोन लालपरीने आठ फेऱ्या केल्या, त्यात २२ प्रवाशांनी प्रवास केला. सिल्लोड मार्गावर तीन बसने सहा फेऱ्या केल्या यात ३४४ प्रवाशांनी प्रवास केला. फुलंब्री मार्गावर सहा फेऱ्या करण्यात आल्या. त्यात ९२ प्रवाशांनी प्रवास केला.

Aurangabad district During the day Run 24 Shivshahi 23 Lalpari
नांदेड : अर्धापूर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला

औरंगाबाद आगार क्र. १ मधून सिडको जालना दरम्यान नऊ बसने १८ फेऱ्या केल्या त्यातून २९६ प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे कन्नड आगारातून औरंगाबाद मार्गावर चार बसने २८९ प्रवाशांनी प्रवास केला. गंगापूर आगारातून औरंगाबाद आणि वैजापूर मार्गावर प्रत्येकी एक बस चालवण्यात आली. सोयगाव आगारातून दोन शिवशाही, एक हिरकणी आणि तीन लालपरी बस अजिंठा मार्गावर चालवण्यात आल्या, त्यातून १२६० प्रवाशांनी प्रवास केला. एसटीने एकूण २४ शिवशाही, एक हिरकणी आणि २३ लालपरी चालवून १५४ फेऱ्या केल्या, यातून तब्बल ३१४७ प्रवाशांनी प्रवास केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com