औरंगाबाद : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना 'पाठ्यपुस्तके' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad first day Textbooks for school students

औरंगाबाद : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना 'पाठ्यपुस्तके'

औरंगाबाद : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या तीन लाख २० हजार ९६२ विद्यार्थ्यांना १५ लाख ६७ हजार ४९० मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १३ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परीषद शिक्षण विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील तीन लाख २० हजार ९६२ विद्यार्थ्यांना १५ लाख ६७ हजार ४९० मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून ३० मे अखेर त्या-त्या तालुक्‍यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्याकडून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोचविण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि त्यांच्या अनुदानित तुकड्यांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते.

तालुक्यांना मिळणारी पुस्तके

  • औरंगाबाद : ४४६५७

  • गंगापूर : ४९२२२

  • कन्नड : ४८३२२

  • खुलताबाद : १५४१९

  • पैठण : ४३२९७

  • सिल्लोड : ४९५६५

  • सोयगाव : १४७७०

  • वैजापूर : ३६१५४

  • फुलंब्री : १९४५६

  • एकूण : ३२०९६२

Web Title: Aurangabad First Day Textbooks For School Students Zilla Parishad Education Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top