औरंगाबाद : विभागात ITI च्या यंदा २० हजार ६५६ जागा

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु
ITI Online admission process start
ITI Online admission process startsakal

औरंगाबाद : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पहिल्या प्रवेशफेरीसाठी विद्यार्थ्यांना २२ जूनपासून व्यवसाय आणि संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करता येतील, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. यंदा मराठवाड्यातील १३७ संस्थांमधून २० हजार ६५६ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मराठवाडा विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर व उस्मानाबाद या आठ जिल्ह्यातील १३७ आयटीआय संस्थेमध्ये २० हजार ६५६ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ८२ शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार ८३२ जागा; तर खासगीच्या एकूण ५० संस्थांमध्ये ५ हजार ८२४ जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात नोंदणी करता येणार आहे.

दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी सूचना

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी एकच अर्ज भरावा, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास विद्यार्थ्यांचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश दिल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि संबंधित विद्यार्थी संपूर्ण प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील ऑनलाइन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवेशफेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अकाउंटला लॉग-इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवडलेल्या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे गरजेचे आहे.

तपशील : कालावधी

l १७ जून ः ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे

l २२ जूनपासून ः अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे व पहिल्या प्रवेशफेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सदर करणे

मराठवाड्याची आकडेवारी

l शासकीय संस्था - ८२ (प्रवेश ः १४,८३२)

l खासगी संस्था - ५५ (प्रवेश ः ५८२४)

जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हानिहाय आकडेवारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com