औरंगाबाद : IIT मुंबई पथकाने केली रस्ते बांधणी प्रकल्पाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad IIT Mumbai team inspects 317 crore road construction project

औरंगाबाद : IIT मुंबई पथकाने केली रस्ते बांधणी प्रकल्पाची पाहणी

औरंगाबाद : मुंबई येथून आलेल्या आयआयटीच्या पथकाने रविवारी स्मार्ट सिटी अंतर्गत ३१७ कोटींच्या रस्ते बांधणी प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पांत बांधण्यात येणारे १११ रस्ते उत्तम दर्जाचे असावे यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीने आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांना नियुक्त केले आहे.

स्मार्ट सिटीच्या बोर्डकडून मंजूर झाल्यानंतर ८४ किलोमीटर लांबीचे १११ रस्त्यांचे बांधणीचे काम महापालिका आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी ने हाती घेतले आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन हे १११ रस्ते पूर्ण शहरात विविध भागात निवडले आहेत. या प्रकल्पांत बांधण्यात येणारे रस्ते उत्तम दर्जाचे असावे यासाठी आयआयटी बॉम्बे (पवई) चे डॉ. धर्मेंद्र सिंह यांची थर्ड पार्टी ऑडिटसाठी नियुक्ती केली आहे.

रविवारी स्मार्ट सिटीचे अधिकारी व प्रकल्प सल्लागार यांच्यासह डॉ. धर्मेंद्र सिंह यांनी हर्सूल, पिसादेवी, एम जी एम, उस्मानपुरा, चंपा चौक, कटकट गेट, औरंगपुरा, नेहरू भवन, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौक व अन्य ठिकाणी जिथे रस्ते करण्यात येणार आहेत त्यांची पाहणी केली. तसेच रेडी मिक्स प्लांट व तिथली प्रयोगशाळा, स्टोन क्रशर आणि सातारा येथील दगडाच्या खदानीचीही पाहणी केली. आतापर्यंत या प्रकल्पांच्या रस्त्यांचे ड्रोन सर्वेक्षण झाले आहे व डिझाईनसुद्धा तयार झाले आहे. आयआयटी पवईच्या टीमने सांगितले की दिलेल्या सल्ल्यांचे सुरुवात पासून राबविण्यात यावे. स्मार्टसिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा नायर,प्रकल्प सहयोगी किरण आढे, प्रकल्प सल्लागार समीर जोशी, अन्य अभियंता व कंत्राटदार पथकासोबत होते.

Web Title: Aurangabad Iit Mumbai Team Inspects 317 Crore Road Construction Project

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top