औरंगाबाद सर्वांच्या आवडीचे शहर; सुनील चव्हाण

सुनील चव्हाण : क्रेडाईच्या पाचदिवसीय ड्रीम एक्स्पो २०२२ला सुरुवात
Aurangabad is favorite city Sunil Chavan Credai five-day Dream Expo 2022
Aurangabad is favorite city Sunil Chavan Credai five-day Dream Expo 2022sakal
Updated on

औरंगाबाद : शहरात पाणी वितरण व्यवस्थेसह रस्ते, रेल्वे आणि विमान सेवा दिवसेंदिवस सुधारत आहे. त्याचप्रमाणे येथील बांधकाम व्यावसायिकसुद्धा परवडणाऱ्या घरांपासून ते आलिशान घर कार्यालयाचे पर्याय उपलब्ध करून देत आहेत. यासह सोलारने सुसज्ज असलेल्या इमारती, ग्रीन बिल्डिंग आणि पार्किंगसाठी अनोख्या कल्पना राबवित असल्याने आगामी काळात औरंगाबाद हे सर्वांच्या आवडीचे शहर असेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी (ता.३०) केले.

जाबिंदा मैदानावर क्रेडाईतर्फे ३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यान होणाऱ्या ड्रीम एक्स्पोचे बुधवारी (ता.३०) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे डीजीएम रविकुमार वर्मा, एचडीएफसीचे बिझनेस हेड चंद्रकांत झाडे, कॉसमॉस शटरिंगचे सिद्धार्थ शहा, जग्वारचे केशूभाई पटेल, मेटारोलचे संदीप देऊळगावकर, येटीप्लायचे विवेक धानुका, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, की क्रेडाई प्रदर्शनात शंभरच्या आसपास स्टॉल आहेत. घर शोधण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, तर कर्जासाठी बँकांनी मदत करण्याची सोय एकाच छताखाली उपलब्ध केल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की औरंगाबाद खऱ्या अर्थाने स्मार्ट होणार असून भौगोलिकदृष्ट्या राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे. क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया म्हणाले, की आतापर्यंत तीन, चार आणि पाच बीएचके ऐकले, यापुढे सहा, सात आणि आठ बीएचके फ्लॅट्स बघायला मिळणार आहेत. अगोदर चार मजली अपार्टमेंट आहेत, आता १५ ते २१ मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे. औरंगाबादही जुन्यासह नवी ओळख तयार करण्यास सज्ज आहे. दोन वर्षांनंतर हा एक्स्पो भरविण्यात आला. सध्या सर्व क्षेत्रात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सिमेंट, लोखंडासह बांधकाम साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. या एक्स्पोदरम्यान दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बगडियांनी केले. संग्राम पठारे यांनी प्रास्ताविक केले.

प्रदर्शनासाठी क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जाबिंदा, इलेक्टेड अध्यक्ष प्रमोद खैरनार, सहसचिव नरेंद्रसिंग जाबिंदा,अध्यक्ष नितीन बगडिया, सचिव अखिल खन्ना, उपाध्यक्ष संग्राम पटारे व भास्कर चौधरी, पापालाल गोयल, सुनील पाटील, रवी वट्टमवार, अजित बापट, प्रशांत अमिलकंठवार, बालाजी येरावार, गोपेश यादव तसेच यूथ विंगचे सौरभ गुप्ता, कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर, उपाध्यक्ष विकास चौधरी, सुनील बेदमुथा, भास्कर चौधरी, अनिल मुनोत, आशुतोष नावंदर, इंद्रजित थोरात, सह-सचिव सुनील राका, पंजाब तौर, रोहित सूर्यवंशी, संचालक दीपक कुलकर्णी, अनिल संचेती, समीर सोनवणे, वुमेन्स विंगच्या श्वेता भारतिया यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com