Corona Updates: मराठवाड्यामध्ये ५ हजार ३७६ रुग्णांची भर, कोरोनाचे बळी वाढले

Marathwada Corona Updates
Marathwada Corona Updates

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच आहे. शनिवारी (ता. तीन) दिवसभरात तब्बल ५ हजार ३७६ नव्या रुग्णांची भर पडली तर ८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ३९५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर २१ जणांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६ हजार ९८१ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७५८ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण १५ हजार ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या चार हजार २६६ अहवालांपैकी एक हजार २०७ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. गेल्या तीन दिवसांत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात एक हजार १३ कोरोनातून बरे झाले आहेत.


जालना जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे पुन्हा आठजणांचा मृत्यू झाला तर कोरोनाचे तब्बल ५६५ नवीन रुग्णांची भर पडली आहे; तसेच ३९८ कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चार हजार ६२३ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यात नवीन ४३४ रुग्ण तर तब्बल १२ मृत्यूंची नोंद झाली. सक्रिय रुग्णांची संख्या ३,०८२ एवढी आहे. वर्षभरातला हा सर्वोच्च आकडा आहे. दरम्यान, ता. २५ च्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात लागलेला दहा दिवसांचा व मागच्या काही दिवसांपासून शिथिल केलेल्या लॉकडाउनची मुदत रविवारी (ता. चार) मध्यरात्री संपत आहे. त्यामुळे पुढचा लॉकडाउनच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.

लॉकडाउन लागणार का, सध्या आहे तसेच कायम राहणार की रात्रीचे लागणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. याबाबतचे आदेश रविवारी दुपारपर्यंत निघतील असे बोलले जाते. लातूर जिल्ह्यात दिवसभरामध्ये ६९२ रुग्णांची भर पडली तर सहा जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ३४३ नवे रुग्ण तर दोन मृत्यूची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्गावर उपचार घेणाऱ्या सहा जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५२७ कोरोनाबाधित नव्याने उपचारासाठी दाखल झाले आहेत; तसेच २७० जणांवर औषधोपचार करून त्यांना सुटी देण्यात आली आहे.

सध्या दोन हजार ८३२ रुग्ण उपचार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात शनिवारी औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन २१३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात शंभर जणांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. आजपर्यंत सात हजार ५८ रुग्ण झाले असून, त्यापैकी सहा हजार ११७ रुग्ण बरे आहेत. आज घडीला एकूण ८४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com