‘अंगणवाडी’अन् ‘आशां’ची तुटपुंज्या मानधनावर लढाई

गावातील वाड्यावस्तीवर जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा आलेख बनवण्याचे काम जीव धोक्यात घालून करत आहेत.
corona.jpg
corona.jpg
Updated on

औरंगाबाद : कोरोनाचे संकट आल्यापासून अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi Staff) व आशा कार्यकर्त्या (Asha Workers) अहोरात्र काम करीत आहेत. गावातील वाड्यावस्तीवर जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा आलेख बनवण्याचे काम जीव धोक्यात घालून करत आहेत. दिवसाला ३० घरी जाऊन प्रकल्पासोबत कोरोनाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, या कामासाठी त्यांना तुटपुंजे मानधन मिळत असून त्याचीही महिना-महिना वाट पाहावी लागते. लॉकडाउन (Lock Down) सुरू झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी (Corona) सर्वेक्षणाची मोठी जबाबदारी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांवर आली. शहरी भागासह ग्रामीण भागातील घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांपैकी कुणाला ताप, सर्दी, खोकला आहे का ? याची तपासणी त्यांनी केली. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती घरोघरी जाऊन दिली. (Aurangabad Latest News Anganwadi And Asha Worker Works On Very Less Stipend)

corona.jpg
औरंगाबादेत लसटंचाई राहणार ३० जूनपर्यंत!

हे काम अजूनही सुरू आहे. पुढचा माणूस 'पॉझिटिव्ह' आहे की 'निगेटिव्ह' हे माहित नसताना प्रत्येक घरात जाऊन त्या माहिती संकलन करीत आहे. यामध्ये बहुतांश सेविका व आशा कर्यकर्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने काहींचा मृत्यू ओढवला आहे. तर काहींना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले आहे. यातही कोरोनापासुन बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, ग्लोज मिळत नाही. याबाबत बोलताना पैठण तालुक्यातील जयश्री थोटे म्हणाल्या, की सुविधांशिवाय आम्ही जीव धोक्यात घालून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. त्यामुळे सरकारने आम्हाला सुविधा व योग्य मानधन दिले पाहिजे.

जीव धोक्यात घालुन काम करावे लागते. यातही आता लोक सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नाही. आम्हाला मोबाईलचे पैसे व वेळेत मानधन नाही का प्रवाशी भत्ता नाही व सणावाराला सुट्टी नाही. दरदिवशी कोरोनाचा रिपोर्ट पाठवावा लागतो. शासनाने मानधन वाढवावे किंवा वेतनावर आम्हाला सेवेत घ्यावे.

मीरा अडसरे, अंगणवाडी सेविका

corona.jpg
पैठण एमआयडीसीत ७० टक्के उद्योग बंद, चार हजार कामगारांवर उपासमारीची वेळ

अंगणवाडी व आशा कर्यकर्तींची कामे

-दरदिवशी १५ ते २० घरे प्रकल्पांचे सर्वेक्षण व ३० घरे कोरोना सर्वेक्षण

- जन्म, मृत्यू, गरोदर, स्तनदामाता, लसीकरण, पोषण आहार याची नोंद घेणे.

- सर्व नोंदी मोबाईलवर ठेवणे. दुपारी १२च्या आत सर्वेक्षण अहवाल पाठविणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com