esakal | Bank Strike: औरंगाबादेत बँक कर्मचाऱ्यांची विविध ठिकाणी बँक बचावसाठी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Strike  In Aurangabad

या संपात सफाई कामगार कर्मचारी ते मॅनेजरपर्यंत सर्वस्तरातील कर्मचाऱ्यांनी सहभाग सहभागी झाल्याने बँकांच्या कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहेत, असेही देवीदास तुळजापूरकर म्हणाले.

Bank Strike: औरंगाबादेत बँक कर्मचाऱ्यांची विविध ठिकाणी बँक बचावसाठी आंदोलन

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. या विरोधात आज सोमवारी (ता.१५) व उद्या दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी शहरातील विविध बँकेचे कर्मचाऱ्यांनी आपल्या बँकेसमोर बँक बचावचे पोस्टर लावत अनोखे आंदोलन केले.
 सिडकोतील वसंतराव नाईक चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रासमोर युनायटेड बँक फोरम युनियनचे देवीदास तुळजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले.


या प्रसंगी श्री. तुळजापूरकर म्हणाले, की युनायटेड बँक फार्म युनियनच्या आवाहनानुसार देशभरातील जवळपास एक लाखपेक्षा जास्त शाखा काम करणारे दहा लाख कर्मचारी आणि अधिकारी संपावर आहेत. बँक खासगीकरणाच्या विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयडीबीआय आणि अन्य दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली. यावर बँक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहेत. बँकांचे खासगीकरण केले गेले तर सर्वसामान्यांची बचत धोक्यात येईल, अशी बँक संघटनांची भूमिका आहे. राज्यात पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे काय हाल झाले ते सगळ्यांनी बघितले आहेत.

त्यापूर्वी लक्ष्मी बँक, येस बँक व कराड बँक यांचे हेच हाल झाले. खासगी बँक बुडाली की सरकारला सार्वजनिक बँक तिची आठवण होते. मात्र या मोठ्या उद्योजकांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना आठ लाख कोटीपेक्षा जास्त गंडवले. अशा मोठ्या उद्योगांच्या हातात सार्वजनिक बँकेच्या चाब्या सोपविण्याचा प्रयत्न सरकार करू पाहत आहे. याला विरोध म्हणून बँक कर्मचारी आणि अधिकारी हा संप करत आहेत.

या संपात सफाई कामगार कर्मचारी ते मॅनेजरपर्यंत सर्वस्तरातील कर्मचाऱ्यांनी सहभाग सहभागी झाल्याने बँकांच्या कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहेत, असेही देवीदास तुळजापूरकर म्हणाले. युनायटेड बँक युनियनचे पुढील आठवड्यात भेट घेऊन हे आंदोलन तीव्र करण्याचा विषयावर चर्चाही केली जाणार असल्याचेही देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. दरम्यान शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीओआय यासह वेगवेगळ्या बँकांच्या कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर बँक बचावचे पोस्टर घेत सोशल डिस्टन्स पाळत हे आंदोलन केले आहेत.

Edited - Ganesh Pitekar

loading image