esakal | Corona Vaccination: औरंगाबाद शहरातील दीड लाख नागरिकांना लसीकरण

बोलून बातमी शोधा

corona vaccine

शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधित लसीकरणाला सुरवात झाली

Corona Vaccination: औरंगाबाद शहरातील दीड लाख नागरिकांना लसीकरण
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना लसीकरणाला हळूहळू प्रतिसाद वाढत आहे. ४५ वर्षावरील व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात महापालिकेने दीड लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. 

शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधित लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स तर तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील आजारी असलेल्या व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण वाढविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

विद्यापीठ, महाविद्यालयातील तासिका ‘ऑनलाइन’ तर परीक्षा होणार ‘ऑफलाइन’

त्यानुसार महापालिकेने सोमवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी जम्बो मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १०९ केंद्रावर तर मंगळवारी (ता. सहा) ११५ ११५ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. दोन दिवस नागरिकांचा लसीकरणाचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत शहरातील तीन लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत एक लाख ५४ हजार १४१ लसी दिल्या आहेत. 

माजी नगरसेवक धावले मदतीला- 
महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या जम्बो मोहीम सुरू करताना माजी नगरसेवकांनी या मोहिमेत सहभागी होत जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. त्यानुसार प्रशासनाला प्रत्येक वॉर्डातून माजी नगरसेवकांचेही सहकार्य मिळत आहे. त्याच बरोबर शहरातील लोकप्रतिनिधी देखील लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

दारुसाठी लावली वाईन शाॅपला आग, अग्निशमन दल व पोलिस धावल्याने मोठी दुर्घटना टळली

 • आत्तापर्यंत आलेल्या लसी-१,६६,२८० 
 • झालेले लसीकरण- १,५४,१४१ 
 • आरोग्य कर्मचारी 
 • पहिला डोस-२७,६०८ 
 • दुसरा डोस-१०,४०१ 
 • फ्रंटलाईन वर्कर्स 
 • पहिला डोस-२३,७४६ 
 • दुसरा डोस-२,५६९ 
 • ४५ वर्षावरील आजारी व्यक्ती 
 • पहिला डोस-३७,७८७ 
 • दुसरा डोस-१६५ 
 • ज्येष्ठ नागरिक 
 • पहिला डोस-५१,४६० 
 • दुसरा डोस-४०५ 
 • ४५ वर्षावरील व्यक्ती-८,९६३ 
 • एकुण लसीकरण केंद्र-१३४ 
 • महापालिका-११२ 
 • खासगी केंद्र-२२