'खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास रस्त्यावर उतरू'

Imtiyaj jaleel
Imtiyaj jaleel
Updated on

औरंगाबाद: लॉकडाऊन रद्द झाल्याच्या घोषणेनंतर संचार बंदी असतानाही खासदार इम्तियाज जलील यांनी मिरवणूक काढली होती. नियमांचे उल्लंघन केल्याने खासदारांवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सिटी चौक पोलिसांना निवेदन देण्यात आले. आज सात वाजेच्या आत गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला.

भाजपाची मागणी-
संजय केणेकर म्हणाले की, 'लॉकडाऊन विषयी भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका मांडली आहे. आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घातला व त्यांना वस्तुस्थिती सांगितली यानंतर जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन रद्द केला. मात्र याचे श्रेय खासदार इम्तियाज जलील यांनी घेतले, एवढेच नव्हे तर संचारबंदीचे उल्लंघन करत मिरवणूकही काढली. यात नियमांचे उल्लंघन झाले आहे. खासदारांसह कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत मास्क घातला नव्हता.'

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचा इशाराही केणेकर यांनी दिला. भारतीय जनता पक्षाने सायंकाळी सात वाजेपर्यंत इम्तियाज जलील व  कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला आहे.

खासदारांसाठी वेगळे नियम आहेत का?
'सर्वसामान्यांवर संचारबंदीचे नियम तोडले तर लगेच कारवाई होते मग खासदारांनी नियमांचे उल्लंघन केले तरी साधा गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला नाही, सरकार आणि एम आय एम यांची मिलीभगत आहे', आरोपही संजय केणेकर यांनी केला. त्यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे माजी उपमहापौर राजू शिंदे, समीर राजूरकर राजगौरव वानखेडे, राजेश मेहता, शिवाजी दांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com